बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करा.

0
mumb 88

बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करा.

मुंबई, दि. १० मे :

बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड करावी अशी  मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी असे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

फोर्ट येथील मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, आज 909 तक्रारी दाखल झाल्या असून जागीच 132 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

अंधेरी गुंदवली येथील के ईस्ट वॉर्ड येथे १० मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *