Ads

--

मुंबईतील घोटाळ्यांची लोकायुक्त मार्फत चौकशी करा.

By Xtralarge News

May 10, 2023 4:40 pm

Ads

मुंबईतील घोटाळ्यांची लोकायुक्त मार्फत चौकशी करा.

मुंबई, दि. १० मे:

राज्यात घटनाबाह्य सरकार आल्यानंतर जानेवारी महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यांच्या कामाचे विविध घोटाळे उघडकीस आणले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत. बिल्डर कॉन्ट्रॅक्रटरचे सरकार बसले आहे.रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६००० कोटींचा रस्ता घोटाळा झाला आहे. १० रस्त्यांची कामे देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. या घोटाळ्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी अशी मागणी युवासेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

खडी घोटाळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे जवळचे कंत्राटदार आणि माणसे यात सामील आहेत. रस्ते फर्निचर १६० कोटींची कामे २६३ कोटी रुपयांना दिली आहेत. यांचा उद्देश शिंद सरकार एका कॉन्ट्रॅक्टरला फायदा व्हावा हा एकमेव उद्देश आहे. पुणे जिल्ह्यातील नद्या मारण्याचे काम. टेकडी सपाट करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री म्हणजे CM म्हणजे corrupt man. कधी शेतात पळून जातात तर कधी गुवाहाटीकुठे निघून जातात. कॉन्ट्रॅक्टरना ६६ टक्के फायदा पोहोचवला जातो आहे. या आरोपासह पुरावे राज्यपालांकडे निवेदनासह आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. या भ्रष्टाचाराची लोकायुक्त मार्फत चौकशी व्हावी मुंबई महापालिका आयुक्तांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

 

 

No comments to show.

Leave a Comment