Ads

--

शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजारांची नुकसानभरपाई द्या.

By Xtralarge News

May 8, 2023 10:03 pm

Ads

शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजारांची नुकसानभरपाई द्या.

मुंबई, दि. ८ मे :

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी मराठवाडा भागातील अवकाळी ग्रस्त पावसामुळे झालेल्या नुकसानीची वेरूळ तालुका खुलताबाद भागात पाहणी केली. यावेळी वेरूळ शिवारातील दिलीप आबा वेताळ यांच्या शेतात येऊन पाहणी केली असता येथील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्याचे त्यांनी बघितले व शासनाने सरसकट पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई त्वरित जाहिर करावे अशी मागणी देखील प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

प्रीती शर्मा मेनन बोलताना पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्याचे एवढे नुकसान झाले आहे पंचनामा करण्यासाठी काहीच राहिलेले नाही आता पंचनामे कसले करताय शेतकऱ्यांना त्वरित दिल्ली पंजाबच्या धर्तीवर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी आम आदमी पक्षाचे छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष सुभाष निकम,युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सतीश लोखंडे, फुलंब्री तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, अमोल पाटणी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment