साहेबांचा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा.
साहेबांचा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा….
मुंबई, दि. ५ मे –
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
आम्ही सर्वजण पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशिरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या ६ तारखेला दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. ७ तारखेला बारामती, ८ तारखेला कोरेगाव, सातारा, ९ तारखेला सातारा, फलटण. १० तारखेला उस्मानाबाद, लातूर, ११ तारखेला नाशिक आणि १२ तारखेला पुणे असा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.
