Ads

--

पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा समितीकडून नामंजूर.

By Xtralarge News

May 5, 2023 4:18 pm

Ads

पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा समितीकडून नामंजूर.

मुंबई दि. ५ मे –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा वाद मागील तीन दिवसांपासून सुरु आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु यासंदर्भातील समितीने पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर केला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी शरद पवार कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा अशी मागणी प्रत्यक्ष करणार असल्याचेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन समारंभात आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती असेही प्रफुल पटेल म्हणाले.

शरद पवार यांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली होती. या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला. त्यावर पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाला, राज्याला, पक्षाला पवार यांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे शरद पवार  पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment