Ads

--

शेतकरी हितासाठी एकत्रितरित्या काम करा..

By Xtralarge News

April 30, 2023 4:45 pm

Ads

शेतकरी हितासाठी एकत्रितरित्या काम करा..

नाशिक, दि. ३० एप्रिल :-

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतांना सर्वांना सोबत घेऊन काम करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येऊन सुयोग्य कारभार करावा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयी झालेल्या उमेदवारांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी पेढे भरवत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना देखील छगन भुजबळ यांनी स्वतः पेढे दिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,किसनराव धनगे,ॲड.बाबासाहेब देशमुख, विश्वासराव आहेर,शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरनारे, शेतकरी नेते संतू पाटील झांबरे,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे,मकरंद सोनवणे,सचिन कळमकर, योगेश जहागीरदार,अल्केश कासलीवाल, हरिश्चंद्र जगताप, बापूसाहेब गायकवाड,सचिन आहेर, कांतीलाल साळवे,संजय पगार लताबाई गायकवाड,संध्या पगारे,मलिक मेंबर, नितीन गायकवाड,बापुसाहेब पगारे, दिलिप मेंगाळ,विकास निकम यांच्यासह शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment