Ads

-

अभिनेते सयाजी शिंदेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार..

By Xtralarge News

April 25, 2023 11:33 am

Ads

अभिनेते सयाजी शिंदेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार..

मुंबई दि. २५ एप्रिल:

सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष संवर्धनासाठी, पर्यावरण जागृतीसाठी समर्पित भावनेने केलेल्या कामाचा गौरव म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा डाँ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

 

यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाँ. सदानंद मोरे, निवेदक मिलींद कुलकर्णी, पत्रकार अशोक वानखेडे, आयोजक अॅड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, राजेश पांडे, सुनिल महाजन, पल्लवी गाडगीळ, अॅड. चित्रा जोशी, असित गांगुर्डे शैलेश चव्हाण, संजय सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

No comments to show.

Leave a Comment