एका बबड्यासाठी १० लाख विद्यार्थ्यांना नाहक त्रास!
मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२०
अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र सरकारने आधीपासूनच नकार देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना, परिक्षांची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते मात्र परीक्षा होणारच असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. हा महाराष्ट्र सरकारला धक्का आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना व सरकारवर तोफ डागली आहे. कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही..शिक्षण तज्ञांची मते घुडकावली…युजीसीला जुमानले नाही, मंत्रीमंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले..अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले…यातून काय साध्य केले? एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला.
सरकारच्या या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकारपुढे ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला! महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण…विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे!! अशा शेलक्या शब्दात शेलार यांनी शिवसेना व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
