रॅप सॉंग युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी सर्वशक्तीनिशी उभी 

0
Screenshot_20230318_114014_Facebook

रॅप सॉंग युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी सर्वशक्तीनिशी उभी

मुंबई दि. १७ एप्रिल –

व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्‍या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहिल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका करणारी रॅप सॉंग्स तयार करत आहेत. या युवकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना पोलीस स्टेशन्सला बोलावून बसवून ठेवणे, त्यांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचे प्रकार पोलिसांकडून सुरु आहेत याबाबत तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

एखादा शब्द अश्लील आहे की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो. म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत असे खडेबोल जयंत पाटील यांनी सरकारला सुनावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *