Ads

-

नायब तहसिलदारांच्या मागण्यावर ५ एप्रिलला मंत्रालयात बैठक.

By Xtralarge News

April 4, 2023 12:20 pm

Ads

नायब तहसिलदारांच्या मागण्यावर ५ एप्रिलला मंत्रालयात बैठक.

अहमदनगर, दि. ४ एप्रिल  :

राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून मागण्या जाणून घेतल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. संदीप चव्हाण प्रांताधिकारी, श्री. गोविंद शिंदे तहसिलदार, श्री. कुंदन हिरे, अमोल निकम आदी उपस्थित होते.

तालुकास्तरावरील नायब तहसिलदार हे अतिशय महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे राजपत्रित वर्ग २ चे पद आहे. त्यामुळे नायब तहसिलदारांच्या मागण्याबाबत शासन लवकरच प्रशासनाशी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

No comments to show.

Leave a Comment