राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामंजस्य करार !

0
IMG-20230329-WA0075

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामंजस्य करार !

मुंबई, दि. ३० मार्च  :

लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत.अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत.अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत दि.४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थानी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

 

मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत सामंजस्य कराराप्रसंगी ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे.सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी,अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्याच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत आहे.

दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाडी दुरूस्ती, भागीरथी फांउडेशनने पुणे,सोलापूर,कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्ती, कॉरबेट फाउंडेशन पुणे येथे १६ अंगणवाडी दुरूस्ती व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी,युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली,नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन तसेच क्षमता वृध्दीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत .

 

पोषण ट्रकर अप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांना आधार सिडींग यशस्वी नोंद घेतलेल्या भंडारा जिल्ह्याने ९८ टक्के नोंद केल्याबद्दल प्रथम क्रमांक, पालघर मध्ये ९७ टक्के नोंद केल्याबद्दल व्दितीय क्रमांक, हिंगोली जिल्ह्याने ९६ टक्के नोंद केली असल्याबद्दल तृतीय क्रमांक, तर नागरी प्रकल्पामध्ये तुंगा मोहिली मुंबई मध्ये ९९ टक्के नोंद असून प्रथम क्रमांक,घाटकोपर १ मुंबई ९८.२ टक्के नोंद असून व्दितीय क्रमांक,दापोडी बोपोडी मुंबई ९८ टक्के नोंद असून तृतीय क्रमांक प्राप्त प्रथम ३ क्रमांकाच्या जिल्ह्यांना व क्रमांकाच्या नागरी बाल विकास प्रकल्पांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

आयसीडीएस योजनेसोबत प्रशंसनीय काम केल्याबद्दल सीएसआर कंपनी पारले ॲग्रो प्रा.लिमिटेड,यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लिमिटेड यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.पुणे १ नागरी प्रकल्प च्या महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सीएसआर सहभाग वाढविल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *