महेश मांजरेकरांना खंडणीसाठी धमकी..

0
MANJREKAR 2

महेश मांजरेकरांना खंडणीसाठी धमकी..

मुंबई, दि. २७ ऑगस्ट २०२०:

निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने धमकी देऊन ३५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. माजरेकर यांना व्हॉट्सअॅपवरून दोन दिवसांपासून धमकीचे मेसेजही येत होते. मांजरेकर यांनी तात्काळ दादर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली

प्रकरण खंडणीचे असल्याने खंडणी विरोधी पथकाने तपास करत रत्नागिरीतून एकाला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी ३४ वर्षांचा असून त्याचा अबु सालेम याच्याशी काहीही संबंध नाही असे उघड झाले आहे.

मांजरेकर यांनी वास्तव, कुरुक्षेत्र, अस्तित्व असे हिंदी चित्रपट केले तर वांटेड, दबंग, बॉडिगार्ड, रेडी या सलमानच्या चित्रपटात त्यांनी भुमिकाही साकारल्या आहेत. मराठीमध्येही त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *