Ads

--

मच्छिमारांसाठी 65 कोटींचे पॅकेज!

By Xtralarge News

August 27, 2020 12:32 pm

Ads

‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा..

मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्याकडून रु.६५ कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा..

मुंबई दि.२७ ऑगस्ट :

किनारपट्टीवर २०१९ च्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या ‘क्यार’ व ‘महा’चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय राज्यमंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला असून चक्रीवादळांचा फटका बसलेल्या मच्छीमारांसाठी ६५ कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

मंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख माध्यमांशी बोलत होते. शेख म्हणाले की, क्यार व महा चक्रीवादळांमुळे सन २०१९-२०२० च्या प्रमुख मासेमारी हंगामात (२४ आॅक्टोबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९) वादळी हवामानामुळे मच्छीमारांना पुर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने मच्छीमारांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. राज्य सरकारने या पॅकेजद्वारे मच्छीमारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर पॅकेजचा लाभ रापणकार संघाचे सभासद, बिगर यांत्रिक नौकाधारक, १-२ सिलेंडर नौकाधारक, ३-४ सिलेंडर नौकाधारक, ६ सिलेंडर नौकाधारक यांना मिळणार आहे लहान मासळी विक्रेता मच्छीमारांना ५० लि. क्षमतेच्या शितपेट्यांसाठी अनुदान देण्यात येईल..

रबनवाज अन्सारी – 8779736068

(मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना.श्री. अस्लम शेख यांचे कार्यालय)

No comments to show.

Leave a Comment