तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, आता जोमाने तयारीला लागा !

0
20220513_093647

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, आता जोमाने तयारीला लागा !

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी –

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, असे MPSC ने जाहीर केल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे. यावर शरद पवार म्हणाले की, “तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा”.

एमपीएससीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची आदरणीय शरद पवार यांनी मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.

एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल असा विश्वास व्यक्त करतानाच शरद पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *