Ads

--

वारकरी संप्रदायाकडून माजी राज्यपाल कोश्यारींचा गौरव..

By Xtralarge News

February 15, 2023 7:34 pm

Ads

वारकरी संप्रदायाकडून माजी राज्यपाल कोश्यारींचा गौरव..

मुंबई, दि. १५ फेब्रुवारी:

राजभवनाचे दरवाजे जनहितार्थ खुले करणारे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सन्मान माजी राज्यमंत्री अमरजित मिश्रा, भाजपा मुंबई सचिव सचिन शिंदे यांच्या प्रयत्नाने वारकरी संप्रदाय, भाजपा मुंबई उत्तराखंड सेलच्यावतीने पंढरीच्या विठुरायाची मूर्ती देऊन करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी राज्यपाल कोश्यारी यांनी या वयातही शिवनेरी किल्ल्यावर पायी जाण्याचा जो आदर्श ठेवला होता, तो अविस्मरणीय आहे. आदिवासींच्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पालघरच्या आदिवासी भागात पोहोचण्याचे धाडस केले. तसेच नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, असा संदेश राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी नक्षलग्रस्त भागात राहून जनतेला दिला असेही माजी राज्यमंत्री अमरजित मिश्रा म्हणाले.

मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे म्हणाले की, श्री. कोश्यारी यांनी हे सिद्ध केले आहे की, लोकशाहीत राज्यपालांना जनतेच्या भावना जपण्याचे पुरेसे अधिकार असतात. त्या भावना त्यांनी वेळोवेळी जपल्या. एक राज्यपाल म्हणून त्यांनी या राज्यावर आपली वेगळी छाप उमटवली असेही ते म्हणाले. वारकरी संप्रदायाचे कृष्णा घाडगे, शंकर चिकणे, विठोबा घाडगे यांनीही शुभेच्छा दिल्या. विशाल तोडणकर, उत्तराखंड सेल भाजपचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई, महामंत्री राजेंद्र शर्मा, सुषमा गैरोला, यशोदा रावत आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment