Ads

--

जुनी पेंशन योजना बंद करण्‍याचे पाप कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारचे !

By Xtralarge News

January 30, 2023 12:35 am

Ads

जुनी पेंशन योजना बंद करण्‍याचे पाप कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारचे !

नागपूर, दि. २९ जानेवारी :

सध्‍या जुन्‍या पेंशन योजनेबद्दल विरोधी पक्षाकडून भ्रम पसरविण्‍यात येत आहे. २००५ साली महाराष्‍ट्रात कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी पक्षाची सत्‍ता असताना जुनी पेंशन योजना रद्द करण्‍यात आली. त्‍यावेळी विधानपरिषदेमध्‍ये कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या शिक्षक मतदार संघातील आमदारांनी साधा ‘ब्र’ सुध्‍दा काढला नाही आणि आता मात्र त्‍यांना जुन्‍या पेंशन योजनेबद्दल फारच पुळका येत आहे, अशी टीका वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

राज्‍यामध्‍ये शिवसेना-कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकार असताना जुनी पेंशन योजना लागू करण्‍याकरिता कोणताही ठोस निर्णय घेतला नाही आणि आता मतदारांना भ्रमीत करण्‍यात येत आहे, परंतु शिक्षक मतदार हा जागृत आहे. त्‍याला माहित आहे जुनी पेंशन योजना बंद करण्‍याचे पाप २००५ साली कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारने केले आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या भ्रमाला जागृत शिक्षक मतदार बळी पडणार नाही आहे. शिंदे-फडणवीस सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्‍याकरिता त्‍यावर काम करीत आहेत.

शिक्षकांच्‍या हक्‍कासाठी पोटतिडकीने ते आपली भुमीका कायम मांडत आले आहे. शिक्षकांच्या जुनी पेंशन योजनेकरिता ते आग्रही भुमीका घेत आहेत. शिक्षकांचे प्रश्‍न सोडवित असताना सत्‍ताधारी पक्ष कोणता आहे हे सुध्‍दा ते बघत नाही व शिक्षकांच्‍या हक्‍कांसाठी कायमच लढा देत आहेत. शिक्षण संस्‍थांचे व्‍यवस्‍थापन आणि शिक्षकांचे प्रश्‍न सोडविताना ते कोणाचीही तमा बाळगत नाही. गाणार २४ कॅरेट सोने आहे. त्‍यांनी कधीही जाती, धर्माचे राजकारण केले नाही. केवळ शिक्षण व शिक्षकांच्‍या उन्‍नतीकरिता सातत्‍याने कार्य करीत आहेत.

मागील १२ वर्षांच्‍या आपल्‍या आमदारकीच्‍या काळात नागो गाणार यांनी जुनी पेंशन योजना सुरू करण्‍याकरिता अभ्‍यासपूर्ण सातत्‍याने संघर्ष केला आहे. जो पर्यंत जुनी पेंशन योजना सुरू होणार नाही तोपर्यंत मी पेंशन घेणार नाही, असे जाहीर करून ते स्वतः पेंशन घेत नाही आहेत. त्‍यामुळे येत्‍या ३० जानेवारी २०२३ रोजी होणा-या शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूकीमध्‍ये स्‍वच्‍छ चारित्र, गुणवत्‍तासंपन्‍न, शांत, संय्यमीवृत्‍ती, ज्ञानसाधना व ध्‍येयनिष्‍ठा जपत शिक्षकांच्‍या न्‍याय्य हक्‍कांसाठी सदैव लढणारे व्‍यक्‍तीमत्‍व गाणार नागो पुंडलीक यांना प्रथम क्रमाकांचे मतदान करून भरघोस मताने विजयी करण्‍याकरिता सर्व शिक्षण संस्‍थेतील मतदार शिक्षक बंधू-भगिनींनी त्‍यांना मतदान करावे असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment