BBC च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी..

0
PTI5_17_2019_000142B

AppleMark

BBC च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी…

मुंबई, दि. २१ जानेवारी:

गुजरात दंगलीचा डाग नरेंद्र मोदी यांचा पिच्छा सोडत नाही असे दिसते. नरेंद्र मोदी गुजराचे मुख्यमंत्री असताना झालेली दंगल सरकार पुरस्कृत होती असा आरोप करण्यात आला. यावर अनेक चौकशा झाल्या. मुख्यमंत्रीपदानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या मागचे गुजरात दंगलीचे भूत पिच्छा सोडत नाही.

गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटाला भारत सरकारने पंतप्रधान मोदी आणि देशाविरुद्धचा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, माहितीपटामागील अजेंडा काय आहे हे आम्हाला माहित नाही, परंतु ते योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हा अपप्रचार आहे.

ही डॉक्युमेंट्री म्हणजे भारताविरुद्धच्या एका खास प्रकारच्या अपप्रचाराचे कथानक चालवण्याचा प्रयत्न आहे. त्यात तथ्य नसल्यामुळे त्याच्याशी निगडित लोक आणि संस्था यांचा एक विशेष प्रकारचा विचार असल्याचे या माहितीपटात दिसून आले आहे. त्यातून वसाहतवादी मानसिकता दिसून येते. यामागे काय अजेंडा आहे हेच कळत नाही.

2002 च्या गुजरात दंगलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन केली होती. समितीला या दंगलीत नरेंद्र मोदींचा हात आहे असा कोणताही पुरावा सापडला नाही. मोदींविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे एसआयटीने म्हटले होते. जून 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोदींना एसआयटीने दिलेली क्लीन चिट योग्य असल्याचे मान्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरात दंगलीवरून तब्बल २० वर्ष विरोधकांनी बदनामी केली. सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली.अशा अनेक घटनांमध्ये विरोध तोंडावर आपटले याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. आता बीबीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी चालवण्यात आली आहे. बीबीसी म्हणजे ‘बोगस बायस कँपेन’ आहे अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *