मुंबई मेट्रो-२ व ७ चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण.
मुंबई मेट्रो-२ व ७ चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण.
मुंबई, दि. १९ जानेवारी :
बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास वेगवान करणाऱ्या मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचेही प्रधानमंत्री यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री यांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आरााखड्याची पाहणी केली. आणि मेट्रो स्टेशवर स्वतः मेट्रो चे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोगरा मेट्रो स्टेशन पर्यत प्रवास केला.
मुंबई 1″ मोबाईल अॅप* : या ॲपमध्ये प्रवाशांसाठी मेट्रो संबधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे आहेत तिथे असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन पॉइंटवरून प्रवाशांना प्रवेश करता यावा यासाठी मोबाईल फोनवर हा ॲप एक क्यूआर कोड तयार करतो.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे सुरूवातीला एमएमआरडीव्दारे चालवण्यात येणा-या मेट्रो कार्डवरती वापरल जाणार आहे.नंतर हळूहळू ही सुविधा लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतूकीच्या इतर पर्यायांसाठी विस्तारीत करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारासाठी या कार्डमध्ये १०० रूपये ते दोन हजार रूपयापर्यंत या कार्डला रिचार्ज करता येणार आहे.
पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने एकमेव सर्वसमावेशक मुंबई मेट्रो नेटवर्कच स्वप्न बघितल होते ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकराना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे
यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, म्हणजेच अंधेरी पूर्व) आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून मेट्रो मार्ग १ सह एकात्मिक केली आहे. दहिसर किंवा गोरेगाव ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन 7 अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (युटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत.सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे.या ट्रेनची डिझाइन केलेला ताशी वेग ९० कि.मी असून क्रियात्मक वेग ताशी ८० कि.मी. आहे.तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे.स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पेसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे.तसेच प्रत्येक दरवाज्यावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅपही आहेत.
मेट्रो स्थानकावर रूफ टॉप सोलर सिस्टिमने सुसज्ज करण्यात येणार आहेत. ती रेस्को मॉडेलवर आधारित योजना आहे. स्थानक, डेपो आणि मागाठणे आरएसएस बिल्डिंगच्या छतावरची उपलब्ध जागा सोलार सिस्टिम बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ वरची स्थानक आणि संबंधित इमारतींवर बसवण्यात येणाऱ्या सोलार सिस्टिमची एकूण अंदाजित वीज निर्मिती क्षमता ३.० मेगावॅट – पीक एवढी असेल. सोलार सिस्टिमद्वारे निर्माण झालेली वीज स्थानकाच्या सहाय्यक भारांवर स्थानिक पातळीवर वापरली जाईल.
दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांवर व्हीलचेअर, ब्रेलसह लिफ्ट बटणे आणि प्लॅटफॉर्मवर टॅक्टाइल टाइल्स आहेत जे दृष्टिहीन लोकांसाठी दिशादर्शक म्हणून काम करतील.
