Ads

--

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट !

By Xtralarge News

January 14, 2023 5:17 pm

Ads

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट !

मुंबई, दि. १४ जानेवारी:

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुक आणखी रंगतदार झाली आहे. सत्याजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीने काँग्रेसला धक्का बसला असताना आता तांबे यांच्या पुढेही आव्हान उभे ठाकले आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असा तांबे यांचा अंदाज होता पण आता त्यांना शुभांगी पाटील यांचे आव्हान असणार आहे.

काँग्रेसची जागा असलेल्या या मतदार संघात डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार असतानाही अर्ज न भरता मुलासाठी जागा मोकळी केली. मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला व काँग्रेसला धोका दिला.आपण काँग्रेसचेच उमेदवार असून भाजपाकडे पाठिंबा मागू असे विधान त्यांनी केले होते पण काँग्रेसने तांबे आमचे उमेदवार नाहीत असे जाहीर करुन पिता पुत्रावर कारवाईचा इशारा दिला. आतापर्यंत सरळ वाटत असलेली ही लढाई आता रंजक झाली आहे.

भाजपाच्या शुभांगी पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला पण त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. नाशिक मतदार संघात काँग्रेस व भाजपाचा अधिकृत उमेदवार नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शुभांगी पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. मातोश्रीवर शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. संजय राऊत यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे स्पष्ट केले. शिवसेनेच्या पाठिंब्यावर शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे.

शुभांगी पाटील यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्याचा उद्धव ठाकरे गटाचा विचार असल्याचे समजते. आता भाजपा सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर करते का हे पहावे लागेल. पण नाशिकची निवडणुक रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment