भीमा कोरेगावमधील भव्य स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा.

0
IMG-20230101-WA0091

भीमा कोरेगावमधील भव्य स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा.

पुणे, दि. २ जानेवारी –
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. आपण राज्य आणि केंद्र सरकार तसेच समाजाच्या वतीने येथे अभिवादनास उपस्थित राहिलो असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

ऐतिहासिक विजय स्तंभ स्मारकासाठी समाज कल्याण विभाग आणि प्रशासनाने आराखडा तयार केला असून त्यासाठी आवश्यक शंभर एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा. एकदा भूसंपादनचा निर्णय राज्य सरकारने घेतला की लगेच विजय स्तंभपरिसरातील अतिक्रमण निर्मूलन करता येईल. स्मारकासाठी ज्यांच्या जमिनी संपादित होतील त्यांना योग्य मोबदला देऊन योग्य पुनर्वसन करावे या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मंत्रालयातर्फे काही निधी मिळेल का याबद्दल प्रयत्न करणार आहे, असेही आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *