Ads

--

दिशा सालियन प्रकरणी सत्ताधार्‍यांची केवळ नौटंकी…

By Xtralarge News

December 22, 2022 2:12 pm

Ads

दिशा सालियन प्रकरणी सत्ताधार्‍यांची केवळ नौटंकी…

नागपूर, दि. २२ डिसेंबर :-
दिशा सालियन प्रकरण झाले त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जात आहे. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

केंद्र सरकारच्या हातात सीबीआय आहे. मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे. याचा तीव्र निषेध अजित पवार यांनी नोंदवला.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. प्रतिज्ञापत्र आल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे, असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

No comments to show.

Leave a Comment