Ads

--

भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

By Xtralarge News

December 21, 2022 7:56 pm

Ads

भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

नवी दिल्ली दि. २१ डिसेंबर :-

धनगर समाजाला खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. शिंदे-फडणवीस सरकार धनगरांची फसवणूक करत आहे, असा आरोप करतानाच भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिंदे गटाच्या शिवसेनेची भूमिका होती. परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे बोलत आहेत, त्यामुळे शिंदे गटाची धनगर आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय? असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला.

आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करत नसून ते तसेच राहिले पाहिजे. इतरांना वेगळे आरक्षण देण्यात यावे, अशीच भूमिका आमच्या महाविकास आघाडीची आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.

 

No comments to show.

Leave a Comment