भूखंड घोटाळाप्रकरणी ठाकरे म्हणतात, ‘त्यांना’ तुरूंगात टाकले मग आता…. ?
भूखंड घोटाळाप्रकरणी ठाकरे म्हणतात, ‘त्यांना’ तुरूंगात टाकले मग आता…. ?
नागपूर,दि. २० डिसेंबर :
नागपूर मधीन जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेनाही यात मागे नाही. खंडपिठाने दिलेला निर्णय गंभीर असून ज्याला न्यायालयाने स्थगिती दिली तो विषय न्यायप्रविष्ट आहे असे न्यायालयाचे निरीक्षण आहे. कायद्यानुसार झाले असेल तर मग स्थगिती का दिली? याचा ऊहापोह होऊ द्या. राजकीय हस्तक्षेप अयोग्य आहे. मुख्यमंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही. विधान परिषद व विधानसभेतही हा विषय लावून धरू असे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
निर्णयाला स्थगिती देण्याची न्यायालयाला का गरज वाटली. नागपूर सुधार प्रन्यासने नकार दिला ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाचे मित्र यांनी न्यायालयाला हस्तक्षेपाच्या बाबतीत सांगितले, उपमुख्यमंत्र्यांनी जे कथानक सांगितले ते एकंदर निर्णय बघता अनुत्तरित आहे. अनिल परब यावर शास्त्रीय पध्दतीत सांगतील. पहाड तर खोदलाच ना, तेव्हाच हे बाहेर आले. उद्या बघा विधानसभेत हा विषय येईल.
आमच्या काळात नागपूर सुधार प्रन्यास प्रकरण झाले तेव्हा मविआ सरकार असले तरी मंत्री तेच आहेत, चूक ते चुकच. त्यांना तुरूंगात टाकले मग आता मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकायचे आहे का? उगाच गुंतागुंत करु नका हा न्यायप्रविष्ट विषय आहे. यांच्यावर आरोप झाले की ते इतरांकडे बोट दाखवतात.
न्यायालयात विषय असल्याने चौकशी समितीचा प्रश्नच नाही. हा विषय लावून धरणारच. काहीतरी थातुरमातुर उत्तर देतात. मग सरकारने हे उत्तर न्यायालयात का नाही दिले? १६ तारखेला न्यायालयाने निकाल देणे, त्याचवेळी लोकायुक्त नेमण्याची चर्चा, हा योगायोग आहे का? मग बावनकुळेंची इच्छा पूर्ण होतेय का? की, चंद्रकांत पाटलांच्या मनावरचा दगड दूर करताहेत असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.
