‘त्या दिवशी’ सुशांतच्या घरी पार्टी नव्हती!
मुंबई, दि. २३ ऑगस्ट..
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येविषयी दररोज नवीन खुलासे होत आहेत. दररोज कहाणी मे ट्विस्ट… सीबीआयने तपासाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तर आणखी वेगवेगळी माहिती पुढे येत आहे.
सुशांत सिंगच्या घरी १३ जूनला एक पार्टी झाली होती त्या पार्टीत कोणी युवा नेताही होता अशा पतंग सोडण्यात आल्या. पण आता जी माहिती सुशांतच्या बिल्डिंगमधील शेजाऱ्यांने दिली ते वेगळीच आहे.
सुशांतच्या घरी १३ तारखेला कोणतीही पार्टी झाली नव्हती आणि १३ तारखेला रात्री १०.३० ते ११ या वेळेत सुशांतच्या घराचे लाईट्स मात्र अचानक बंद झाले होते. असे याआधी कधी झाले नव्हते. सुशांत रात्री उशीरापर्यंत जागा असायचा. पण त्या रात्री किचनसोडता सगळ्या घरातील लाइट्स बंद होत्या, असे या शेजारी महिलेने सांगितले.
सुशांतच्या आत्महत्येची दोन महिन्यांपासून बरीच चर्चा होत आहे. त्याच्या गर्लफ्रेंड किती, त्याने गांजा ओढला होता, तो डिप्रेशनमध्ये होता, त्याच्या भल्या मोठ्या पैशांवर डल्ला मारला अशी चर्चा होत राहिली. अनेकजण आपले हिशोब चुकते करण्यासाठी उठसुठ कोणाचे तरी नाव घेऊन गरळ ओकत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून सुरु झालेली ही चर्चा राजकीय वळण घेत आत्महत्यावरून हत्या इथंपर्यंत आली. ही आत्महत्या की हत्या याचा तपास सीबीआय करेलच पण सुशांतला न्याय मिळावा आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावे, हीच सर्वांची अपेक्षा…
