नागपूर ला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार.

0
IMG-20221205-WA0054

नागपूर ला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार..

मुंबई, दि.६ डिसेंबर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व  नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्या असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत ग्रामविकासाला गती प्राप्त करुन देणारी प्रबोधिनी नागपूरला उभारण्याचा व यासह  अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोअर समितीची बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडली. राज्यातील विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षातील कार्यक्रम व उपक्रम याचा आढावा घेत असताना “यशदा” च्या माध्यमातून पुणे जवळील ताथवडे परिसरात अद्ययावत सुसज्ज सभागृह, प्रशिक्षणासाठी छोटी सभागृहे एका वर्षात पूर्ण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे एस एन डी टी विद्यापिठाचे उपकेंद्र निर्माण करुन अमृत महोत्सवी वर्षात महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी 43 विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी 55 कोटी च्या निधिस मान्यता प्रदान करण्यात आली. या विद्यापीठ परिसरात महिला क्रांतीकारकाच्या आठवणी जागृत व्हाव्या, प्रेरक माहीती, चित्रकृती त्या भागात असावी असे निर्देश देण्यात आले.

दिव्यांगासाठी नुकताच  स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. अमृत महोत्सव वर्ष साजरे होत असताना दिव्यांगासाठी विशेष आणि नावीन्यपूर्ण योजना आखली जावी.

ग्रामविकास विभागामार्फत ‘ महाराष्ट्र ग्रामविकास व संशोधन प्रबोधिनी‘ महारुद्र हे अमृत महोत्सव वर्षानिमित्त उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रबोधिनी नागपूर येथे उभारली जाईल. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थावर काम करणाऱ्या सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी शिक्षण,  प्रशिक्षण, संशोधन या संस्थेतून चालेल.   येत्या काही दिवसात या विषयासाठी स्वंतत्र बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मी उपस्थित राहू असे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

भारतीय स्वांतंत्र्यांच्या अमृमहोत्सवानिमित्त  राज्यात येत्या काळात विविध विभागामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विविध विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. हे उपक्रम नक्‍की कसे असतील याबाबत आज सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्यासमोर करण्यात आले. हे उपक्रम राबविण्यासाठी येत्या नागपूर अधिवेशन काळात याबाबत पुरवणी मागण्या करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *