संविधान व लोकशाहीसाठी तरूणांनी एकत्र काम करण्याची गरज
संविधान व लोकशाहीसाठी तरूणांनी एकत्र काम करण्याची गरज…
पटणा, दि. 24 नोव्हेंबर :
संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,आम्ही आजवर संपर्कात होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे.
या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तेजस्वी यांना भेट दिली.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती. प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे. पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीश कुमार वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
