राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज पण कृषिमंत्री गायब !
राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज पण कृषिमंत्री गायब !
बीड, दि. 9 नोव्हेंबर :
कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत नाहीत. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना कृषिमंत्री आणि घटनाबाह्य सरकार गायब असल्याची टीका माजी मंत्रीव शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते बीड दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं..
आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यात हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचं प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त केली. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. कोणी काही बोललं की चौकश्या लावा, तुरुंगात टाका, तडीपार करा…हे सगळं चाललं आहे ते हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत; किंबहुना हुकूमशाही आलेलीच वाटत आहे. सभेला परवानगी नाकारता, सुषमा अंधारेना परवानगी नाकारता, किशोरी पेडणेकर यांना छळता, ऋतुजा लटकेंना छळलं…महिलांचा छळ सुरू आहे. आज राजकीय लोकांना सतावत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
