Ads

---

‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय.

By Xtralarge News

November 6, 2022 6:45 pm

Ads

‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय.

मुंबई, दि.६ नोव्हेंबर :

महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या आहेत. लटके यांना एकूण ६६,५३० मते पडली तर नोटाला 12 हजार मतं पडली.

‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९ व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:. ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३० तर नोटा : १२,८०६ मते अशी एकूण मते : ८६,५७० पडली.<span;> ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण ३१.७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होताभाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे शिवसेनेचा विजय अधिक सोपा झाला. रमेश लटके यांच्रा अकाली निधनाने ही जागा रिक्त झाली होती. ॠतुजा लुकतुके यांच्या विजयानंतर शिवसेनेने जल्लोष केला.

No comments to show.

Leave a Comment