Ads

---

शेतक-यांच्या लेकरांचे सरकार, शेतक-यासाठीच काम करणार.

By Xtralarge News

October 28, 2022 9:05 pm

Ads

शेतक-यांच्या लेकरांचे सरकार, शेतक-यासाठीच काम करणार.

उस्मानाबाद, दि. 28 ऑक्टोबर :
हे सरकार शेतक-यांच्या लेकरांचे आहे त्यामुळे शेतक-यांसाठीच काम करत आहे. पुतणा मावशीचे प्रेम दाखवणा-यांपासून आपण सर्वांनी सावध रहावे असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील अतिवृष्टी भागाची पाहणी करताना ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

यापूर्वीच शेतकऱ्याच्या खात्यावर खरिपाच्या पेरणी नंतर साठ कोटी जमा झाले आहेत आता परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीचा जवळपास दिडशे कोटी रूपयाचा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा, वाशी, इंदापूर आणि कळंब तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पालकमंत्री सावंत यांनी पाहणी केली.

परांडा येथे शुक्रवारी सकाळी अतिवृष्टी भागाची पाहणी करून त्या भागातील शेतक-यांना धीर देऊन वाशी येथे पालकमंत्री पोहचताच दशमे गावातील आत्महत्या केलेले शेतकरी दाम्पत्य बाबुराव रघुनाथ उघडे व सारिका बाबुराव उघडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबीयांचे सांत्वन करून मुलगा रूपशे आणि मुलगी दिव्या यांच्याकडे संवेदना व्यक्त केल्या. यावेळी या दोन्ही मुलांना आपण दत्तक घेत असल्याचे मुलांचे मामा विवेक चव्हाण यांना सांगून त्यांच्या शिक्षणापासून विवाह पर्यंतची जबाबदारी घेत आहोत असे सांगितले. या कुटुंबीयांना पाच लाखाची मदतही तात्काळ केली. घाटनांदूर येथील शेतकरी सय्यद जावेद करिम यांच्या आईच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला त्यांचेही सांत्वन करून त्यांन दोन लाख रूपयांची मदत दिली.

गोजवाडा येथील नदीवरील पुलांची पाहणी करून या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांशी गावाच्या विकासावर चर्चा करताना सावंत यांनी गावांतर्गत येणारया रस्त्या करिता पस्तीस कोटी रूपयांचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केल्या असल्याचे ग्रामस्थांना आवर्जून सांगितले. यावेळी गावातील वयोवृद्ध यांची आपुलकीने विचारपूस त्यांनी केली.

इंदापूर गावातील राजेंद्र गीरी या शेतकरयांच्या बांधावर जाऊन त्याच्यासह गावातील शेतकऱ्यांसह सावंत यांनी पाहणी करताना परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केले असल्याचे सांगून हे सरकार आपले सर्वांचे म्हणजेच शेतकरयांच्या पोरांचे आहे, त्यामुळे आपण काळजी करू नये असा दिलासा देत यापूर्वी खरिपा नंतर साठ कोटी रूपयांची मदत आपण वाटली आता ही नियम अटीचा विचार न करता शेतकऱ्याचा विचार करून जवळपास दिडशे कोटी रूपया पेक्षा जास्त मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल असे सावंत यांनी यावेळी सांगितले. एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही याची स्वतः खात्री करणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणानी उभे आहे असा विश्वासही सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments to show.

Leave a Comment