बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे ईडी सरकारचे दुर्लक्ष

0
images - 2022-10-25T213235.031

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे ईडी सरकारचे दुर्लक्ष..

मुंबई, दि. २५ ऑक्टोबर

मुंबईतील सांताक्रूज, मरोल सह अन्य ठिकाणी बेस्ट बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. प्रवाशांना ऐन सणासुदीत त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार राज्यसरकार आहे. सलग तिसऱ्या दिवशी देखील संप सुरू असून बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकरिता ठोस निर्णय घेण्यात शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केला.

पुढे बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणल्या की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार हा समान काम, समान वेतन याप्रमाणे मिळत नाही. त्याचबरोबर दिवाळी बोनस दिला जात नाही हा बेस्ट कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारने यात लक्ष देणे अपेक्षित आहे, परंतु शिंदे फडणवीस सरकार सामान्य जनतेला न्याय न देता सरकार वाचवण्यात मग्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईची काही पडलेली नाही, तर फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. मग मुंबईला वाली कोण? असा प्रश्न प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थित केला.

मुंबईची बेस्ट तोट्यात जात असली तरी फडणवीस सरकारला त्याचे काही घेण देणं नाही आहे. बेस्ट कर्मचारी दिवस रात्र मुंबईकरांची सेवा करतात तर, त्यांना त्यांचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. दिवाळी बोनस, पगारवाढ, जॉईनिंग लेटर, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास या प्रमुख मागण्या असून या मान्य व्हायला पाहिजेत, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी राज्य सरकारकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *