प्रत्येक बालक सशक्त व सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील

0
20221024_134337

प्रत्येक बालक सशक्त व सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील….

मुंबई, दि. 25 ऑक्टोबर :-
प्रत्येक बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम व कौशल्यपूर्ण  शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास प्रयत्नशील आहे. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो अशी मनोकामना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

बालगृहातील मुलांसमवेत दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते. दिवाळीनिमित्त महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माटुंगा येथील द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन व श्रद्धांनंद बालगृह या संस्थना भेट दिली.यावेळी महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री लोढा यांनी बालगृहातील मुलांना दिवाळीनिमित्त  शुभेच्छा दिल्या. ही दिवाळी या मुलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट घेऊन येवो, अशी  मनोकामना व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक बालकांना निरामय आरोग्य लाभावं, यासाठी महिला व बालविकास च्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचे मतही लोढा यांनी व्यक्त केले.

महिला व बालविकास आयुक्त आर.विमला यांनी प्रास्ताविक  करताना म्हणाल्या,या संस्थेत एकूण 102 , श्रद्धानंद महिला वसतिगृह येथे १२८ मुली आहेत  या मुलांच्या प्रवेश प्रक्रिया, मोफत शालेय शिक्षण, मुलांसाठी विशेष शिक्षणाचे व्यवस्था, विविध शिवण वर्ग,वाचनालय, उद्यान कला, मैदानी खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सण साजरे करणे, शैक्षणिक व मनोरंजनात्मक सहलीचे आयोजन या संस्थेच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *