अंधेरी पूर्व मालपा डोंगरीमध्ये थेट मतदारांच्या भेटीगाठी

0
IMG-20221016-WA0075

अंधेरी पूर्व मालपा डोंगरीमध्ये थेट मतदारांच्या भेटीगाठी….

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर :
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मालपा डोंगरी भागात आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी घरोघरी जाऊन वैयक्तीक भेटी घेऊन मतदारांशी थेट संवाद साधला.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून गेले दोन दिवस मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार या मतदार संघात प्रचार व नियोजन कार्यात आहेत. काल त्यांनी या मतदार संघातील निवडणूक संचलन समितीची बैठक घेतली तर मुंबईती भाजपा आमदार, पदाधिकारी  यांची बैठक घेऊन प्रचाराच्या जबाबदारीचे वाटप केले.

आमदार ॲड आशिष शेलार यांनी मालपा डोंगरी नंबर ३ या मराठी लोकवस्ती असलेल्या भागात दौरा करुन थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या त्यांच्या संवाद रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्या सोबत उमेदवार मुरजी पटेल, वॉर्ड अध्यक्ष अविनाश भागवत व भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *