भाजपशासित राज्यात दलितांवर वाढते हल्ले!
उत्तर प्रदेशातील हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटूंबियांची डॉ. नितीन राऊत घेणार भेट.
मुंबई, दि. 19 ऑगस्ट…
उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे स्वतः प्रत्यक्ष उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. डॉ. राऊत हे मृतक सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील एका दलित सरपंचाची या क्रूर पद्धतीने हत्या झाली. त्यामुळे देशभर उत्तर प्रदेशात दलित सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील दलित समुदायाला एक विश्वास देण्यासाठी डॉ. नितीन राऊत स्वतः या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. आझमगड जिल्ह्यातील सरपंच यांची गोळ्या घालून क्रूर हत्या करण्यात आली. यापूर्वी ही उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर जीवघेणे हल्ले आणि अन्य प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अत्याचार करण्यात आले आहेत.
भाजपशासित राज्यात दलितांवर वाढते हल्ले.
देशात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दलितांवर हल्ल्यांची संख्या वाढले असल्याचे खुद्द केंद्र सरकारच्या अखत्यारितील एन सी आर बी अर्थात राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने म्हटले आहे. दलितांवर सर्वाधिक हल्ले आणि अत्याचार उत्तर प्रदेशात होत असून त्याखालोखाल गुजरातचा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत 2014, 2018 अशा अवघ्या चार वर्षात 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीत गुजरात मध्ये दलितांवरील अत्याचारांमध्ये 26 टक्क्यांनी, हरियाणात 15 टक्क्यांनी तर मध्य प्रदेशात वेगळ्या मराठीचे रचना वेळेत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय आता महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना 2014 ते 18 या काळात दलितांवरील अत्याचारात 11 टक्क्यांनी वाढ झाली होती.
