Ads

-

देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहती नजीकची ड्रेनेज लाईन बदला

By Xtralarge News

October 14, 2022 6:36 pm

Ads

देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहती नजीकची ड्रेनेज लाईन बदला…

मुंबई, दि.१४ ऑक्टोबर :
देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे असे निर्देश  मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले. एम. ईस्ट वॉर्ड, गोवंडी (पूर्व) येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अबू आझमी, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवनार बेस्ट कामगार वसाहत मुंबई (पूर्व) येथे गेले ३० वर्षे ड्रेनेज लाईन तसेच इमारतींची देखभाल दुरूस्ती  झालेली नाही. त्यामुळे वसाहतीतील रहिवाश्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार जितेंद्र झगडे यांनी मांडली होती याची दखल घेत मंत्री लोढा म्हणाले, देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत येथील नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी. या कामामध्ये दिरंगाई करू नये.

अगरवाडी देवनार येथील महादेव भाऊ पाटील यांनी दाखल केलेल्या अनधिकृत बोअरवेल बंद करण्याच्या तक्रारीबाबत गोवंडी पोलीसानी कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले. संदीप घरूगडे यांनी महाराष्ट्र नगर ते मानखुर्द घाटकोपरला जोडणारा मार्ग पावसाळ्यात  पूर्णपणे बंद होत असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या तक्रारीवर महाराष्ट्र नगर ते मानखुर्द घाटकोपर येथे पूलाचे बांधकाम गतीने पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या. मोहम्मद अब्रार चौधरी यांनी दाखल केलेल्या कब्रस्तान बाबतच्या जागेच्या तक्रारीची योग्य दखल मुंबई महापालिकेने  घेण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले.

नागरिकांनी २७५ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर ७४ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम १५ ऑक्टो रोजी एच वेस्ट वॉर्ड- वांद्रे पश्चीम येथे होणार  असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in  बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

No comments to show.

Leave a Comment