महापालिकेच्या शिक्षकांचे निवृत्तीवेतन सात दिवसात द्या.

0
IMG-20221007-WA0055

महापालिकेच्या शिक्षकांचे निवृत्तीवेतन सात दिवसात द्या.

मुंबई, दि.७ ऑक्टोबर :-
महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनविषयक लाभ सात दिवसात देण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही करावी असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

महापालिकेचे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतरही बराच कालावधी उलटून गेला तरी सेवानिवृत्तीचे व इतर देय लाभ मिळत नाहीत. अशी तक्रार आमदार अतुल भातखळकर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री लोढा म्हणाले, महापालिकेचे जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत आणि अशी काही प्रकरणे असतील ती तत्काळ निकाली काढावीत. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये असे निर्देशही त्यांनी दिले.

पाणी कमी दाबाने येणे,पाणी वेळेत न येणे, स्वच्छता, शौचालय, नादुरूस्त स्ट्रीट लाईट दुरूस्त करून मिळाव्यात, झोपडपटटी पुर्नविकास लवकरात लवकर करावा यासह  २६९  विविध विषयांवर नागरिकांनी  आपल्या तक्रार अर्ज दिले. तर ९५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शनिवार ०८ ऑक्टो रोजी के ईस्ट वॉर्ड अंधेरी पूर्व वॉर्ड ऑफीस येथे पालकमंत्री भेट देणार आहेत. तरी आपल्या तक्रारीच्या अर्जासह ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये सहभागी  व्हावे असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

 

सोमवार १० ऑक्टो रोजी आर सेंट्रल  व आर नॉर्थ वॉर्ड- बोरविली पश्चीम येथे., बुधवार दि. १२ ऑक्टो रोजी एल वॉर्ड- कुर्ला पश्चीम., गुरुवार दि.१३ ऑक्टो टी वॉर्ड -मुंलुड पश्चिम.,शुक्रवार दि.१४ ऑक्टो रोजी  एम ईस्ट वॉर्ड- गोंवडी पूर्व., शनिवार  दि.१५ ऑक्टो एच वेस्ट वॉर्ड -वांद्रे पश्चिम.,बुधवार,दि १९ ऑक्टो रोजी पी नॉर्थ वॉर्ड- मालाडा पश्चीम येथे.,गुरुवार दि २० ऑक्टो रोजी पी साऊथ वॉर्ड- गोरेगाव पश्चीम येथे.,सोमवार येथे ३१ ऑक्टो रोजी एम वेस्ट वॉर्ड -चेंबुर येथे.,बुधवार दि.०२ नोव्हें रोजी के वेस्ट वॉर्ड- अंधेरी पश्चिम येथे.,गुरुवार दि. ०३ नोव्हें रोजी एच ईस्ट वॉर्ड -सांताक्रुझ पूर्व येथे. शुक्रवार दि.४ नोव्हें रोजी येथे नियोजित रोजी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात वॉर्ड ऑफीस येथे हा उपक्रम वरील प्रमाणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *