महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला कसा गेला ?

0
20220519_112635

महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला कसा गेला ?

मुंबई, दि. १३ सप्टेंबर :
महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरात गेला आहे. या प्रकल्पासंदर्भात ९० टक्के काम झाले होते. जूनपर्यंत महाराष्ट्रात असलेला हा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला ? याचे उत्तर खऱ्या मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा प्रश्न माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याची खोके सरकारला इच्छा नाही. पिस्तुल चालवणे, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या.वेदांत, फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे हे चांगलेच आहे. तरी देखील या प्रोजेक्टसाठी एक वर्षात अनेक बैठका घेऊन,भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रोजेक्ट येईल अशी काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. तेच पुढे नेत असताना मागच्या महिन्यात आम्ही बघितलं की या खोके सरकारने देखील आमच्याच कामावर पुढे केलेलं आणि महाराष्ट्राला आश्वासन दिलेलं की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार आहे. तरीदेखील आज ही बातमी वाचून थोडा धक्का बसला आहे की हा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून महाविकास आघाडी सरकारने एवढं सगळं पाठबळ देऊन हा प्रोजेक्ट इथ आला नाही. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही.

खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाही अंकुश दिसत नाही म्हणून या गोष्टी होत आहेत. खोके सरकारला पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करणे, गुंडागर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल हे पहावे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *