• Sat. Feb 8th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 452 Today: 1 Total: 4040326

गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये..

मुंबई, दि. 13 सप्टेंबर –
१९९३ साली दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याच व ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केलं, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील सभेत केलेल्या टीकेवर केला.

शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याच पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल केलं. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ होवो असा हल्ला दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला.

मराठवाड्यात येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरले,  विकासाबाबत एक शब्दही काढला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याच काम करत  असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

सामना वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली.त्यामुळे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना संभाळून बोलण्याचा इशारा दानवे यांनी दिला.

पैठण येथील सभेत मंत्री संदीपान भुमरे यांनी घोषणा केलेल्या योजना या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजुरी झाल्या होत्या. आता उपमा गव्हाण योजना घोषित केली ती संकल्पना अप्पा निर्मळ यांची होती, एकप्रकारे भुमरे हे टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत आहेत. हे कंत्राट त्यांच्या जावई यांना मिळाल्याचं आरोप अंबादास दानवे यांनी करत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *