Ads

--

नवनीत राणांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देतील का?

By Xtralarge News

September 9, 2022 8:00 pm

Ads

नवनीत राणांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देतील का?

मुंबई, दि. ९ सप्टेंबर :-
मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालाच शिवाय जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी काल अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती मात्र त्या युवतीने स्वतः हून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केल्याने या प्रकरणात कुणाला रस होता हे समोर आले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

दुसरीकडे बुधवारी याकुब मेमनच्या कबरीचा विषय भाजप आमदार राम कदम यांनी ट्वीट करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातही जुना फोटो असल्याचे समोर आले. एकंदरीतच या दोन्ही घटनांमधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? याचाही तपास करण्यात यावा अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात  आला होता तर दुसरीकडे पालघरमध्ये साधूच्या हत्येप्रकरणीही पोलिसांकडे बोट दाखवण्यात आले. मध्यंतरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दांपत्याने करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली होती. आता तर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे त्यामुळे अमरावती पोलिसांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

याकुब मेमन आणि कथित लव्ह जिहादचा विषय आणून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीय तेढ निर्माण करणार्‍या अशा नेत्यांवर कारवाई करण्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसदी घेतील का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

No comments to show.

Leave a Comment