Ads

---

उद्धव ठाकरेंनी याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरची परवानगी कशी दिली?

By Xtralarge News

September 8, 2022 3:39 pm

Ads

उद्धव ठाकरेंनी याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरची परवानगी कशी दिली?

मुंबई, दि. ८ सप्टेंबर:

शिवसेना सत्तेत असताना दाऊदची समर्थक होती हे आम्ही पाहीले आणि सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेली त्यावेळी मात्र ती दाऊदची प्रचारक झाली आहे. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्बस्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

मैदाने, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्ती संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय? याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते, ते सांगायचे की, आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, तर याकूबच्या कबरीचे सौंदर्यीकरण होणार ना?

तुम्ही २५ वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरीही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे. माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना, मग आता ही कबर उखडून दाखवा.

अफजल तेरे कातील जिंदा है हम शर्मिंदा है…असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. नवाब मलिक, अस्लम शेख, आणि तूकडे तुकडे गँगला खूश करण्यासाठी करण्यात आले आहे. याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर याकूबच्या फाशीवर कारवाई झाली.अस्लम शेखने विरोध केला होता हे विसरून चालणार नाही.

No comments to show.

Leave a Comment