महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार अंगिकारावे
महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार अंगिकारावे…
येवला, दि. ७ सप्टेंबर:-
महात्मा बसवेश्वर हे विश्र्वगुरु असून त्यांनी मांडलेले विचार हे समाजासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येकाने बसवेश्वर महाराजांचे चरित्र वाचावे. त्यांचे हे विचार जीवनात अंगिकारावे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
अंदरसुल येथे विश्र्वगुरू क्रांतीसुर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज चौकाचा नामकरण सोहळा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, किसनराव धनगे, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे,रामदास काळे,बाळनाथ धुमाळ, सरपंच सविता जगताप, उपसरपंच किशोर बागुल,झुंजारराव देशमुख, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले की, अंदरसुल येथे महात्मा बसवेश्वर चौक फलकाचे अनावरण झाले याचा अतिशय आनंद आहे. जगात सर्वदूर शांतता निर्माण व्हावी यासाठी जागतिक शांततेचा त्यांनी संदेश दिला. देशात स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिले असे सांगत समाजाचे जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
