…चुकीच्या बातम्या देऊन संभ्रम निर्माण करणे थांबवा !

0
अशोक चव्हाण

…चुकीच्या बातम्या देऊन संभ्रम निर्माण करणे थांबवा !

मुंबई, दि. २ सप्टेंबर:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याच्या बातम्यांनी दिवसभर चर्चेला उधाण आले आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर १०-१२ आमदार भाजपात जाणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे या भेटीने पुन्हा चर्चेला उधाण आले पण फडणवीस व चव्हाण दोन्ही नेत्यांनी भेट झाल्याचा इन्कार केला आहे तसेच काँग्रेसकडूनही यावर खुलासा करण्यात आला आहे.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यासंदर्भात म्हमाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांना विनंती आहे त्यांनी हे थांबवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *