Ads

--

जांब समर्थ गावातील ‘त्या’ मूर्तींचोरांचा छडा कधी लागणार ?

By Xtralarge News

August 29, 2022 11:33 am

Ads

जांब समर्थ गावातील ‘त्या’ मूर्तींचोरांचा छडा कधी लागणार ?

जालना, दि. 29 ऑगस्ट:

जांब समर्थ गावातील पुरातन मूर्ती व चोरांचा शोध घेण्यास सात दिवसांत पोलिसांना अपयश आले आहे. इतक्या दिवसांत चोरीस गेलेल्या मूर्ती सापडायला हव्या होत्या, असे खडे बोल सुनावत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस तपासावर असमाधान व्यक्त करत ताशेरे ओढले.

जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मगाव असलेल्या जांब समर्थ गावातील पुरातन काळातील ऐतिहासिक मूर्तींची चोरी झालेल्या राम मंदिराला विरोधी पक्षनेते दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस तपास कुठपर्यंत आला याची माहिती त्यांनी घेतली व आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. चोरी झाल्यावर विधान परिषदेत यावर आम्ही आवाज उठवला होता. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. समर्थ रामदास स्वामी यांचे विचार मानणारे गावातील तसेच बाहेरील नागरिक यांच्या भावना यात जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सरकारने यात जातीने  लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आम्ही योग्य मार्गाने सोडवू, असे देखील दानवे यांनी म्हटले.

चोरीस गेलेल्या पुरातन काळातील ऐतिहासिक मूर्तींचा शोध घेण्यासाठी अधिक पोलीस बळाचा वापर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी समर्थांचे वंशज भूषण महारुद्र स्वामी, पुजारी व स्थानिक गावकरी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्क प्रमुख हिकमदादा उढान,माजी आमदार शिवाजीराव चौथे, जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे, भास्कर राव अंबेकर, तालुकाप्रमुख उद्धव मरकड,पुजारी धनजंय देशपांडे, समर्थ वंशज भुषण स्वामी,जामसमर्थ गावचे सरपंच बाळासाहेब तांगडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment