79 वर्षांच्या राज्यपालांनी पायीच सर केला शिवनेरी!

0
IMG_20200817_105807

पुणे, दि. 17 ऑगस्ट 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, वय 79 वर्ष, या वयात त्यांनी  एका दमात तेही फक्त 50 मिनिटात शिवनेरी किल्ल्यावर पायी चढाई केली. त्यांचा फिटनेस पाहून सगळेच अवाक झाले. खरे तर त्यांना हेलिकॉप्टरने जाता आले असते पण या वयातही पायी शिवनेरी सर केला. किल्ल्यावर त्यांनी राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. तसेच गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले.

राज्यपाल कोश्यारी यांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते असे ते म्हणाले.

खासदार संभाजीराजे यांनी राज्यपाल यांच्या स्वागत करून म्हणाले की, राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी ‘पायी’ सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो.

राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेट ची एक बैठक रायगड वर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल.

स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल.

राज्यपाल कोश्यारी यांचा हा आदर्श घेऊन प्रत्येक मंत्री,  आमदार, खासदार यांनी वर्षातून एका किल्ल्यावर तरी पायी जावे. या भटकंतीचा किल्ले संवर्धनासाठी उपयोग होईलच पण त्यांचा फिटनेसही वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *