मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी यंदा फोडायची

0
20220820_101614

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी यंदा फोडायची…

मुंबई, दि. 20 ऑगस्ट:-

दहीहंडी फोडल्यानंतर या हंडीमधील मलई आपल्याला सर्वांना वाटायची आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार आहोत आणि त्यामधील विकासाची मलई ही प्रत्येक शेवटच्या माणसांपर्यंत विकासाच्या रुपात पोहचविणार आहे असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.

आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आज ख-या अर्थाने गोविंदांच्या आनंदाला उधाण आले आहे. राज्य सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्द्ल गोविंदांच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाजपाचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज्य सरकारने गोविंदांना विमा कवचही दिले, तसेच कोविडनंतर सुमारे २ वर्षांनी दही हंडी उत्सवावरील सर्व निर्बंध राज्य सरकारने दूर करुन गोविंदांसह राज्यातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण मिळवून दिला आहे असेही दरेकर यांनी सांगितले.

आता सर्व खुले खुले वाटत आहे कारण आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी व गणेशोत्सव यावरील सर्व निर्बंध दूर झाले आहे. याच प्रमाणे नवरात्री उत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे. आता दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे गोविंदा हे फक्त गोविंदा राहिले नाहीत, तर ते आता खेळाडू झाले आहेत. गोविंदा या खेळाडूंना सर्व सवलती मुख्यमंत्र्यांनी जाहिर केल्या आहेत. गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी १० लाखांचे विमा कवच व तर मुंबई भाजपाच्यावतीने आशिष शेलार यांनी१० लाखाचे कवच दिले आहे, त्यामुळे गोविंदांना आता डबल विमा कवच मिळाले आहे .

याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, कृपाशंकर सिंह, दहीहंडी उत्सवाचे आयोजक मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशोकवन येथील दहिहंडी उत्सवात १ लाख ११ हजार १११ रुपयांची दही हंडी लावण्यात आली होती. यावेळी सुमारे २५० गोविंदांनी दही हंडीला सलामी दिली. यावेळी विविध दहीहंडी पथकांना अनेक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *