IMG-20200815-WA0025

पंढरपूर : 15 ऑगस्ट

स्वातंत्र्य दिन सोहळा देशभरात सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात असताना पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरही या उत्सवात सहभागी झाले. विठ्ठल व रुक्मिणी मातेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती,व कामिनी या तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव,स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला सजवते.  स्वातंत्रदिना निमित्तही विठ्ठल मंदिर सजवण्यात आले आहे. झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांची सजावटीने मंदिर सजले आहे.

पुण्यातील सचिन अण्णा चव्हाण आणि संदीप भाऊ पोकळे पाटील यांनी या सजावटीसाठी दान दिले आहे. ही सुुुुबक, सुुंदर, आकर्षक सजावट मंदिर समितीमधील कर्मचा-यांनी केली. पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांत विठ्ठल रुक्मिणीचे  रूप अधिकच खुलून दिसत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी विठ्ठल रुक्मिणी दर्शन बंद आहे. असे असले तरी तीन फुलांच्या सजावटीमुळे सावळा विठुराया आणि रुख्मिणी मातेचे हे  रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे .

बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *