आरेमध्ये कारशेड हा मुंबईकरांच्या हिताचा नाही..
आरेमध्ये कारशेड हा मुंबईकरांच्या हिताचा नाही..
मुंबई, दि. २४ जुलै :
मेट्रो- ३ ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली असून ही बाब अत्यंत निंदनीय आहे. आम्ही आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असा इशारा आम आदमी पार्टीचे नेते रुबेन मस्करेन्हास यांनी दिला.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो- ३ ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली. याचा निषेध करण्याकरीता आम आदमी पार्टीने आरे येथील पिकनिक पाॅईंट येथे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे नेते आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदवला आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
मुंबईकरांचे फुफुस असलेले आरे वाचविण्याकरिता पुन्हा एकदा आम आदमी पार्टी मुंबईकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. मुंबईला दोन्हीची गरज आहे आणि दोन्ही मिळू शकतात. ही केवळ राजकीय इच्छाशक्तीची बाब आहे, अशी टिका रुबेन मस्करेन्हास यांनी केली.
