Ads

-

बेस्टचे ई बस कंत्राट रद्द करा…

By Xtralarge News

July 15, 2022 6:54 pm

Ads

बेस्टचे ई बस कंत्राट रद्द करा…

मुंबई, दि. 15 जुलै :
बेस्टने ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेले 2100 ई बसचे कंत्राट रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तेक्षेप करावा, अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

बेस्टने नव्या 2100 ई बस खरेदी करण्याचे कंत्राट ईव्ही ट्रान्स प्रा. ली. या कंपनीला दिले असून हे कंत्राटाची निविदा प्रक्रिया चूकीची असल्याची टिप्पणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतर ही बेस्ट ने सदर कंत्राट रद्द केलेले नाही. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही न करता हे कंत्राट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.

उलट उच्च न्यायालयाच्या या निकालानंतरही बेस्ट व्यवस्थापन सदर कंपनीलाच कंत्राट मिळावे म्हणून मदत करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून शासनाने तातडीने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment