कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आजची पूजा…

0
20200814_130223

दि. 14 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्रांचा विचार करताना कोल्हापूरच्या महालक्ष्मी अर्थात अंबाबाईला विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील हे मंदिर ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो..

या मंदिराला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी जगदंबा.

दर मंगळवारी व शुक्रवारी तसेच नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी विशेष गर्दी होते.

महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तिपीठे मानली जातात.

कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता l मातुः पुरुं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितम्‌ l तुळजापूर तृतीयं स्यात्‌ सप्तशृंग तथैवच ॥

या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखली जाते.

लाॅकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येत नाही, घरातूनच महालक्ष्मी ला नमस्कार करा आणि दर्शन घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *