Ads

--

दहिसरच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे शिंदे गटात

By Xtralarge News

July 13, 2022 12:30 pm

Ads

दहिसरच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे शिंदे गटात

मुंबई, दि. 13 जुलै :
शिवसेनेतील बंडखोरांत दररोज नव्या बंडखोरांनी भर पडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंड करून गेलेल्या आमदारांना अत्यंत खालच्या भाषेत टीका करणा-या नगरसेविका शितल म्हात्रे यांनीही शिंदे गटाचा हात धरला आहे.

शितल म्हात्रे या मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका आहेत. बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. असे त्या म्हणतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करित भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिसाठी शुभेच्छा दिल्या. असंख्य कार्यकर्त्यांसह पाठींबा देणाऱ्या शीतल म्हात्रे यांना भविष्यात आपल्या प्रभागातील लोकोपयोगी विकासकामे करावीत व त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी त्यांना दिले. याप्रसंगी शीतल मुकेश म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment