राज्यातील नगरपालिका निवडणूकांना स्थगिती द्या!

0
Munde

राज्यातील नगरपालिका निवडणूकांना स्थगिती द्या!

मुंबई, दि. १२ जुलै ;

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे ती कायम ठेवण्यास सांगितलं आहे. पण राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करावी आणि या निवडणुकांना स्थगिती द्यावी असे भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

आपली भूमिका मांडताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “कोर्टाची ऑर्डर माझ्या हातात नाही. मात्र ज्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या घेणे क्रमप्राप्त आहे असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रसंगात माझी अपेक्षा फक्त सरकारकडून आहे. ओबीसींच्या प्रश्नावर लढणारी एक कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे की या निवडणुकांच्याबाबतीत निवडणूक आयोगाशी त्यांनी चर्चा करावी आणि या निवडणुकांना स्थगिती द्यावी.”या स्थगितीचे मुख्य कारण हे अर्थातच ओबीसी आरक्षण नसणे हे असलं पाहिजे. आत्ता जवळपास  ९२ ठिकाणी नगरपरिषदेच्या व काही नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतर उरलेल्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण देणे हा पुन्हा समान न्याय नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळणार आहे हा आत्मविश्वास नव्या आलेल्या सरकारमुळे लोकांमध्ये निर्माण झाला आहे. हा आत्मविश्वास तेव्हाच फलित ठरेल जेव्हा सर्वांना ओबीसी आरक्षण मिळेल. राजकीय आरक्षणाच्या माध्यमातूनच या ओबीसी आरक्षणाच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असे ठाम मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *